उस्मानाबाद : रत्नागिरी-नागपूर हायवेवर अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची 'लूट'

26 Oct 2017 11:06 AM

समृद्धी महामार्गात अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपले हात धुवून घेतल्याची चर्चा असतानाच, रत्नागिरी-नागपूर महामार्गावरही अनेक अधिकाऱ्यांनी जमिनी विकत घेतल्याचा आरोप होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावानं जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. मराठवाड्यातल्या जमिनीचे खरेदीदार थेट नाशिकचे सीए आणि पुण्याचे अधिकारी आहेत. त्या जमिनी नातेवाईक आणि परिचितांच्या नावे केल्या आणि रस्ते विकास मंत्री नितिन गडकरींनी हायवेची घोषणा करताच जमिनींचं भूसंपादन झालं.

LATEST VIDEOS

LiveTV