मुंबई : कोकण किनारपट्टीलाही ओखी वादळाचा धोका, पावसाचा इशारा

02 Dec 2017 10:54 AM

ओखी चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना इकडं महाराष्ट्रातही त्यामुळे चिंता आहे. कारण ओखी वादळाचा फटका दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकणाला बसण्याची भीती स्कायमेटनं व्यक्त केली आहे.
ओखी वादळामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाच ते आठ डिसेंबरदरम्यान काही भागात पावसाची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV