नोटाबंदीची वर्षपूर्ती: सरकारकडून काळापैसाविरोधी दिन

08 Nov 2017 11:18 AM

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अशाप्रकारे नोटबंदीचा निर्णय़ झालाय. त्यामुळे 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कोरला गेला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीतून चलनातून काढून घेतल्यानंतर त्याच अनेक चांगले-वाईट परिणामही दिसले. आज सत्ताधारी भाजपानं काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवलंय. त्यानिमित्तानं मोदींचे दिग्गज मंत्री नोटबंदीचे फायदे लोकांना सांगणार आहेत. तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्कातंत्राचा वापर करत आज आणखी काही घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. तर तिकडे विरोधकांनीही कंबर कसलीय. आणि आज देशभर काळा दिन साजरा केला जातोय.

LATEST VIDEOS

LiveTV