उस्मानाबाद : भाजप सरकार फसवणीस सरकार आहे, जनआक्रोश मेळाव्यात काँग्रेसची टीका

05 Nov 2017 11:18 PM

सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त सुरु असलेल्या जाहिरातबाजीवरुन विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. भाजप सरकार हे फसवणीस सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. उस्मानाबादमध्ये काँग्रेसनं जनआक्रोश मेळाव्याचं आयोजन केलं होतं. दरम्यान उद्या विदर्भात होणाऱ्या जनआक्रोश सभेआधी स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडली. वडेट्टीवार यांनी नरेश पुगलिया यांनी वेगवेगळ्या सभेचं आयोजन केलं. अशोक चव्हाणाच्या मध्यस्थीनंतरही हा वाद शमलेला नाही. तर पृथ्वीराज चव्हाणही विदर्भातील मेळाव्याला हजेरी लावणार नसल्याचं समजतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV