उस्मानाबाद : 6 तास चार्जिंग, 100 किमी अंतर, प्रदूषणमुक्त ई रिक्षा रस्त्यावर

30 Oct 2017 02:54 PM

मोदींच्या मेक इन इंडियाचा एक भाग म्हणून ई रिक्षाची संकल्पना प्रत्यक्षात आली. राज्यातील अनेक भागांमध्ये या रिक्षा दाखल झाल्या आहेत. या रिक्षा रस्त्यावर धावताना कसलाही आवाज नाही की धूर नाही. विशेष म्हणजे या गाडीला कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही. इलेक्ट्रिसिटीवर 6 तास चार्ज केलं की आरामात 80 ते 100 किलोमीटर अंतर पार करता येतं. ग्रामीण भागासाठी 30 रु आणि शहरातील लोकांसाठी 60 रुपये एवढ्या वीज बिलात ही रिक्षा चार्च होते. या रिक्षाची ऑन रोड किमत 1 लाख 65 हजार आहे. विशेष म्हणजे इंधनावर चालणाऱ्या रिक्षाप्रमाणे सर्व सोई-सुविधा इथं आहेत. पुणे, नांदेड, अजिंठा, उस्मानाबाद, तुळजापूर, पंढरपूर इथं या रिक्षा धावायला सुरुवात झाली आहे.

LiveTV