उस्मानाबाद : बोंडअळीनं शेतकऱ्यांचं 15 हजार कोटींचं नुकसान

07 Dec 2017 09:45 PM

कापूस उत्पादकांना देशोधडीला लावणाऱ्या बोंडअळीनं थोडेथोडके नव्हे तर तब्बल 15 हजार कोटी फस्त केले आहेत. कृषी खात्याच्या अहवालानुसार बोंडअळीमुळं 65 टक्के कापसाचं नुकसान झालं. या नुकसानीचा आकडा 15 हजार कोटीच्या घरात पोहोचला आहे.

जिनिंग उद्योगाशी निगडीत 10 हजार कामगारांचा रोजगारही धोक्यात आल्याचं समजतंय. त्यामुळं शेतकरी हवालदील झाले असून त्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत.

राज्याचे मंत्री बीटी कंपन्यांना यासाठी जबाबदार धरतं असले तरी झालेल्या नुकसानीची कंपन्या किती आणि कशी भरपाई देणार याबद्दल मंत्री काहीही स्पष्टपणे बोलत नाहीत.

गारपीटीत बळी गेलेल्या चिमण्यांसारखी कापसांच्या बोंडाची अवस्था झाली आहे. प्राण गेलेत आता शरपंजरी उरली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV