डोंजा/ उस्मानाबाद : सचिनचं दत्तक गाव, क्रिकेटचा डाव

19 Dec 2017 11:33 PM

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज दत्तक घेतलेल्या उस्मानबादच्या डोंजा गावचा दौरा केला आणि तिकडच्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओंनी रस्ता डागडुजीची सूचना देऊनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याबद्दल सचिनने नाराजी व्यक्त केली. सचिन जेव्हा गावात दाखल झाला, तेव्हा गावकऱ्यांनी सचिनचं जंगी स्वागत केलं. प्रत्येक घरावर दिमाखात डोलणाऱ्या गुढ्या, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. यावेळी डोंजेकरांची गोलंदाजी खेळताना सचिन गडबडून गेला.कधी नो बॉल तर कधी वाईड ब़ॉल टाकत डोंजेकरांनी सचिनला बुचकळ्यात टाकलं.
सचिनला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठी गर्दी झाली होती, मात्र पोलिसांनीही यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला.

LATEST VIDEOS

LiveTV