लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भगवं प्रेम, सरकारी कार्यालयं, साईन बोर्ड सारं भगवं

11 Nov 2017 10:09 PM

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवा रंग जरा जास्तच प्रिय आहे. म्हणूनच आपलं ऑफिस, सरकारी कार्यालयं, सरकारी बस आणि सरकारी डायरी भगव्या रंगात रंगवल्या नंतर आता यूपीतल्या रस्त्यावरचे साईन बोर्डही भगवे होणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर राज्य सरकारच्या लोक निर्माण विभागानं याची तयारी सुरु केली. याची डिझाईनही तयार करण्यात आली. शिवाय या बोर्डांवर माहितीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही असेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं घरही सध्या भगव्या रंगात रंगवण्याचं काम सुरु आहे. आधी मुख्यमंत्री निवासाला फक्त पांढऱ्या रंगात रंगवलं जात होतं. मात्र आदित्यनाथ यांच्या भगवा प्रेमामुळं इथं सगळंच भगवं झालं.

LATEST VIDEOS

LiveTV