जगातील 20 अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान

01 Nov 2017 03:54 PM

पाकिस्तानचं जगातील सर्वात अपयशी 20 देशांच्या यादीत नाव आलं आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं गेलं. यासोबत पाकिस्ताननं देशांतर्गत असणाऱ्या अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्याची गरज असल्याचं मत ही या अहवालात मांडण्यात आलं.
पाकिस्ताननं शेजारच्या देशांमध्ये अतिरेकी पाठवून अस्थिरता पसरवण्यापेक्षा देशांतर्गत सुरक्षेचा विचार आधी करावा, असंही या अहवालातून पाकिस्तानला खडसावण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV