इस्लामाबाद/ पाकिस्तान : कुलभूषण जाधव आणि कुटुंबियांची भेट हा पाकिस्तानचा दिखावा?

25 Dec 2017 06:27 PM

तब्बल दीड वर्षानंतर पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव कुटुंबीयांना भेटले. मात्र ही भेट केवळ पाकिस्तानचा दिखाऊपणा होता का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे कुलभूषण यांना आई आणि पत्नीला भेटवण्यात आलं. दुपारी 3 वाजता अर्धा तास ही भेट चालली. एका जाडजूड काचेच्या आडून कुलभूषण यांना भेटवण्यात आलं. विशेष म्हणजे, पाकिस्ताननं या भेटीचा एकही फोटो प्रकाशित करण्याची संधी दवडली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर माणुसकीचा दिखावा करण्यासाठी पाकिस्ताननं ही नापाक हरकत केली. त्यामुळे माणुसकीची चाड दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरला.

LATEST VIDEOS

LiveTV