पालघरमध्ये रिलायन्स कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक

06 Nov 2017 08:30 PM

पालघरमध्ये रिलायन्स कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी रिलायन्स गॅस लाइन्स भूसंपादनात कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप केला. कंपनीने शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आंदोलनात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

LATEST VIDEOS

LiveTV