पालघर : विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये हाणामारी, चावून युवकाचा अंगठा तोडला

26 Oct 2017 10:57 AM

विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पश्चिम रेल्वेवरील विरार स्टेशनवर विरार-डहाणू पॅसेंजर उभी होती. त्यावेळी आपापसातील वादातून भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडण्यात आला. मारामारी करणारे युवक केळवेमध्ये राहणारे आहेत. इतकी मोठी घटना होऊनही रेल्वेच्या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV