पालघर : परतीच्या पावसामुळे 8 जणांचा मृत्यू, भातशेतीचंही नुकसान

12 Oct 2017 09:12 PM

गेल्या सहा दिवसांपासून परतीच्या पावसानं पालघर जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून दहापेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. भातशेतीचं तर अतोनात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील 76 हजार हेक्टर क्षेत्र भातशेती खाली आहे. यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यानं भाताचं पिकं जोमानं आलं होतं. मात्र परतीच्या पावसानं भाताचा पीक अक्षरश: आडवं झाल्यानं शेतकऱ्यांची हाती काहीही लागणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV