पालघर : संजान-उंबरगाव स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे

22 Dec 2017 11:57 AM

पश्चिम रेल्वे मार्गाच्या मुंबई अहमदाबाद ट्रॅकवर सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. संजान आणि उंबरगाव स्थानकादरम्यान रुळ तुटला. सुदैवाने ही बाब वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली. पण या घटनेचा परिणाम गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे. वलसाड एक्सप्रेससह अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे केळवे रोड स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकला तडा गेला आहे. गेल्या आठवड्यात रेल्वेने मेगा ब्लॉक घेत ट्रॅकचं काम केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV