पंढरपूर : वैकुंठ स्मशानभूमीतून अस्थींची चोरी, सोन्याच्या दागिन्यांसाठी अस्थी पळवल्या

16 Nov 2017 09:06 PMआतापर्यंत तुम्ही पैसे, दागिने अथवा वाहनांच्या चोरीच्या घटना बघितल्या असतील...एेकल्या असतील.. मात्र पंढरपुरात वैकुंठ स्मशानभूमीतून चक्क अस्थींची चोरी झालीय. मृताच्या अंगावरील दागिन्यांच्या आशेने चोरटयांनी अस्थी पळवून नेल्याचं उघड झालय.. पंढरपूरातील नंदा म्हेत्रे यांचं काल निधन झालं. प्रथेनुसार अंगावरील दागिन्यांसह त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अंगावर सोन्याचे अनेक दागिने होते. या दागिन्यांसाठी चोरट्यानं जळालेली चिता हुडकून त्यांच्या अस्थी आणि राख पळवून नेली आहे. अस्थी चोरी गेल्यानं तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम कसा करायचा हा मोठा प्रश्न आता म्हेत्रे कुटुंबाला पडला आहे . दरम्यान, याअगोदरही दागिन्यांसाठी अनेक महिलांच्या चितेतून अस्थींची चोरी झालीय मात्र नगरपालिका प्रशासन यावर आळा घालण्यासाठी कोणतही ठोस पाऊल उचलत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे.

LATEST VIDEOS

LiveTV