पंढरपूर : जादा वसुली करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई, गिरीश बापटांची माहिती

18 Nov 2017 01:09 PM

हॉटेलातील जीएसटी 5 टक्क्यांवर आणल्यानंतर आता ग्राहकांकडून जादा वसुली करणाऱ्या हॉटेल आणि मॉल्सवर कारवाईला सुरुवात झाली आहे. हॉटेलचालकांनी नव्या जीएसटी प्रणालीनुसार दरपत्रक तातडीनं बदलावेत. हॉटेलमधील फलकांवर दरसूची तातडीनं लिहावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं आहे. ते पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV