पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी विठूरायाची पंढरी सज्ज, उद्या चंद्रकांतदादांच्या हस्ते महापूजा

30 Oct 2017 11:45 AM

कार्तिकी यात्रेसाठी विठूरायाची पंढरी सज्ज झाली आहे. उद्या होणाऱ्या यात्रेसाठी चार लाख भाविक राज्यभरातून पंढरीत दाखल झाले आहेत. उद्या पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली.
हरीनामाचा गजर करत शेकडो दिंड्या पंढरीमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे आवघं पंढरपूर भक्तीरंगात दंग झालं. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरी इथं जनावरांचा मोठा बाजार असतो. त्यात सुमारे 10 कोटींची उलाढाल होते.

LATEST VIDEOS

LiveTV