पंढरपूर : लालकिल्ला, राजपथावरील संचलनाची प्रतिकृती

21 Oct 2017 01:42 PM

दिवाळीनिमित्त पंढरपूरमध्ये दिल्लीतील संचलनाची भव्य प्रतिकृती उभारुन शहीद मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंढरपूरमधील अमोल बखरकर हा तरुण दरवर्षी गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतो. ही प्रतिकृती पाहण्यासाठी अनेकजण गर्दीही करतात. मात्र यावर्षी अमोलनं लाल किल्ल्यावरील राजपथाच्या संचलनाची प्रतिकृती उभारली. यामध्ये रॉकेट, दारुगोळा, सैन्यदल यासारख्या लष्करी साहित्यांची प्रतिकृती बनवण्यात आली. याशिवाय मुंबई-अहमदाबाद सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV