पानिपत : दुचाकीतील पेट्रोल पिणाऱ्या अतरंगी माकडाचा व्हिडिओ व्हायरल

11 Nov 2017 11:36 PM

माकडचेष्टा, मर्कटलीला हे शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. अनेकदा ही माकडं नसते उपदव्याप करून डोकेदुखी ठरतात तर काही वेळा मनोरंजनही करतात. पानिपतमध्ये मात्र या माकडाची एक वेगळीच कुरापत पाहायला मिळते आहे. हे माकड चक्क दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरुन पितं. पानिपतच्या इसार बाजारात हे माकड आहे. एखादी टू व्हीलर थांबली की, हे माकड तिकडे जाते इंजिनजवळच्या पेट्रोलचा पाईप काढत ते स्ट्रॉला तोंडाला लावल्यासारखं करत सगळं पेट्रोल पिऊन टाकते. एकीकडे पेट्रोलचे दर वाढत असताना हे माकड टू व्हीलरमधलं पेट्रोल पिऊन टाकत असल्याने टू व्हीलरवाल्यांच्या डोक्याला ताप झाला.

LiveTV