पनवेल : सकल मराठा समाज समन्वयकांची आज बैठक, मोर्चाची पुढील दिशा ठरणार

25 Dec 2017 03:00 PM

राज्यस्तरीय सकल मराठा समाज समन्वयकांची आज पनवेलमध्ये बैठक होणार आहे.. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसल्यानं या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.. सकाळी 11 वाजता पनवेलमध्ये ही बैठक पार पडेल.. मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा झाल्यानंतर भाजप सरकारने घोषणांचा पाऊस पाडला... मात्र त्या घोषणा अद्याप कृतीत उतरल्या नाहीत. त्यामुळे भाजप सरकारला जागे करण्यासाठी या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे...

LATEST VIDEOS

LiveTV