पनवेल : फक्त सोनं चोरणारा चोर, 20 घरफोड्यातून 21 लाखांचं सोनं

23 Dec 2017 09:09 AM

पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात पनवेल पोलिसांना अखेर यश आलं आहे. या चोरानं आतापर्यंत तब्बल 18 ते 20 घरफोड्या केल्या आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधील आझमगढमधून अटक करण्यात आली. श्रावण राजभर असं या चोराचं नाव आहे. विशेष म्हणजे हा चोर फक्त सोनं चोरी करायचा. याशिवाय तो चांदीचे दागिने किंवा घरातील दुसऱ्या कोणत्याही किंमती वस्तूला हात लावत नव्हता.

LATEST VIDEOS

LiveTV