परभणी : गंगाखेड रस्त्याची प्रचंड दुरवस्था, नागरिकांच्या तक्रारीकडे सरकारचं दुर्लक्ष

22 Nov 2017 03:27 PM

परभणीतील गंगाखेड रोडची सध्या रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालीय. याचा परिणाम दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या अपघातांची संख्या वाढलीय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परभणी ते गंगाखेड अंतर केवळ एका तासाचे आहे. परंतु रस्त्यातील खड्ड्यांमुळे सध्या यासाठी दोन तास लागतायत.
दरम्यान या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास स्थानिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. तसेच या रस्त्याला नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन असे उपहासात्मक नामकरण देखील केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV