परभणी : सोनपेठमधील रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्ड्यात बसून आंदोलन

19 Dec 2017 04:00 PM

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी परभणीच्या सोनपेठमधील ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं. तालुक्याला जोडणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करु, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, राज्यातील अनेक रस्त्यांवर अद्याप मोठमोठे खड्डे असल्याचं पाहायला मिळत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV