बीड : वैद्यनाथ साखर कारखान्यात टाकी फुटून दोन कामगारांचा मृत्यू

09 Dec 2017 12:18 PM

बीडमधल्या परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम ऊसाच्या रसाची टाकी फुटल्यानं 2 कामगरांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी 5 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडेंचा हा कारखाना आहे. उष्णतेमुळे उसाची टाकी फुटल्याने उकळता रस कामगारांच्या अंगावर पडला. जखमी कामगारांना अंबाजोगाईमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV