बीड : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यात जाण्यापासून धनंजय मुंडेंना रोखलं

10 Dec 2017 11:45 AM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून चार कामगारांचा मृत्यू झाला. तर इतर जण जखमी आहेत. यावेळी मात्र दुर्घटनास्थळी जाण्यापासून मुंडेंना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर दहा मिनिटांनंतर त्यांना एकट्याला कारखान्यात सोडण्यात आलं. धनंजय मुंडेंनी यावेळी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. हा कारखाना पंकजा मुंडे यांच्या मालकीचा आहे.

LiveTV