स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : बीरदेवाच्या यात्रेत भंडाऱ्याची उधळण, पट्टणकोडोलीला सोनेरी साज

11 Oct 2017 09:06 PM

अवघी पट्टणकोडोली भंडाऱ्यानं सोनेरी झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रासह 5 राज्यातले भाविक दरवर्षी इथं येतात.
बिरदेवासमोर नतमस्तक होतात. विशेषत: धनगर समाजाचं बिरदेव आराध्य दैवत आहे..
यात्रेतला महत्वाचा सोहळा म्हणजे देवाची आणि फरांडेबाबांची भेट.. धनगरी ढोल, कैताळाचा निनाद, खारीक-खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करत फरांडेबाबांची स्वारी निघते.. मरगुबाई मंदिर, नारायण गावडे मंदिर अशा मार्गानं हेडाम नृत्य करत फरांडेबाबा देवापाशी येतात.. आणि तिथं भाकणूक अर्थात पुढच्या वर्षाची भविष्यवाणी करतात..

LATEST VIDEOS

LiveTV