पुणे: पिंपरीत लग्नाच्या काही तासांपूर्वी तरुणीची आत्महत्या

13 Dec 2017 10:24 AM

लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत काल (मंगळवार) रात्री घडली. मात्र, तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सीमा सकारे असं या बावीस वर्षीय तरुणीचं नाव असून तिच्या लग्नासाठी 14 डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. गेले काही दिवस घरात लग्नाची बरीच धावपळही सुरु होती. काल रात्री सीमा हातावर मेंहदी काढून घरी आली आणि थेट आपल्या खोलीत निघून गेली.

LATEST VIDEOS

LiveTV