पिंपरी-चिंचवड : राज्यातील पहिल्या देशी गाईंच्या स्पर्धेला सुरुवात

03 Dec 2017 11:00 PM

राज्यातील पहिल्या देशी गाईच्या स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झालीये. पहिल्याच दिवशी गोप्रेमींनी या स्पर्धेला पसंती दर्शवली. गीर, देवणी, लाल सींधी, लाल कंधार, खिलार, अश्या बारा जातींच्या गाई राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचं नशीब अजमावत आहेत. पिंपरी चिंचवडच्या मोशीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गोसेवा समितीने या स्पर्धेचे आयोजन केलंय... राज्यात पहिल्यांदाच अशा स्पर्धा भरल्याने गोप्रेमींनी देखील याला पसंती दिली. सोलापूर, लातूर, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील दोनशे गाईंनी या स्पर्धेत भाग घेतलाय.

LATEST VIDEOS

LiveTV