पिंपरी-चिंचवड : घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

06 Dec 2017 11:18 PMपिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोराच्या निगडी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. धनंजय मुने असं या आरोपीचं नाव असून, तो तडीपार गुन्हेगार आहे. त्याच्यावर आतापर्यंत एकूण ३२ गुन्हे दाखल आहेत. निगडी परिसरात या आरोपीने १० दिवसांपूर्वी चोरी केली होती. हा आरोपी रावेतमध्ये लपून बसला असल्याची बातमी पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचुन मोठ्या शिताफीनं त्याला बेड्या ठोकल्या. धनंजय मुने कडून पोलिसांनी ४१ तोळे सोनं, एक दुचाकी आणि ५० हजार रुपये असा एकडून साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV