पिंपरी : चालू लिफ्टचा दरवाजा उघडल्यानं महिलेचा मृत्यू

27 Nov 2017 12:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एका ज्येष्ठ महिलेला सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्टमुळे जीव गमवावा लागला. निलिमा चौधरी असं या महिलेचं नाव आहे. दिवाळीतील ही घटना आहे.

निलिमा दिवाळीच्या सुट्टीसाठी चौधरी झारखंडहून पिंपळे सौदागर इथे मुलाकडे आल्या होत्या. 23 ऑक्टोबर रोजी त्या लिफ्टमधून जात होत्या. परंतु अचानक चालू लिफ्टचं दार उघडलं. भीतीने त्या लिफ्टच्या दारात पडल्या आणि दोन मजल्यांना जोडणारा स्लॅब त्यांच्या डोक्यावर पडला.

निलिमा चौधरी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

या दुर्घटनेमागे सोसायटीने या लिफ्टचं मेन्टेनन्स ठेवलं नसावं, किंवा मेन्टेनन्स काम करणाऱ्यांचा हलगर्जीपणा असावा. मात्र पीडब्लूडीकडून येणाऱ्या अहवालातून हे सगळं स्पष्ट होईल. हा अहवाल येत्या दोन-तीन दिवसात येणं अपेक्षित आहे.

LATEST VIDEOS

LiveTV