पिंपरी चिंचवड: जाहिरात करारनामे रद्द करण्याचा पीएमपीएमएलचा निर्णय

12 Oct 2017 09:15 AM

करारातील अटींचं उल्लंघन केल्याबद्दल जाहिरात करारनामे रद्द करण्याचा निर्णय पीएमपीएमलने घेतलाय. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदत दिली असून नव्या संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. जाहिरात पोटी तीन महिने महापालिकेकडे आगाऊ रक्कम देणे अपेक्षित असते. या नियमाचे उल्लंघन जाहिरातदार कंपन्यांनी केलं आहे. सध्या जाहिरातदारांकडे पीएमपीएमलचे सर्व बस थांबे आहेत. यामध्ये 269 साधे बसथांबे, 120 पुणे पॅटर्न बसथांबे आणि 806 स्टीलचे बसथांब्यांचा  समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV