भारतीय तरुणीच्या हातातील फलकाचं मॉर्फिंग, पाकचा बनाव

19 Nov 2017 04:09 PM

एका भारतीय तरुणीच्या फोटोतील मजकूर बदलून तो व्हायरल करणं पाकिस्तानच्या संरक्षण खात्याला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरकडून हे व्हेरिफाईड अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे.

कलवप्रीत या भारतीय तरुणीनं भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या एका फलकाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र माथी भडकवण्याच्या हेतूनं त्या फोटोतील मजकूर बदलून पाकिस्तानच्या संरक्षण खात्यानं तो ट्वीट केला.

भारताविषयी प्रेम असल्याचं सांगणाऱ्या कवलप्रीतच्या मूळ फोटोतील मजकूर बदलून भारताचा द्वेष वाटत असल्याचं लिहिण्यात आलं. त्यामुळे मॉर्फिंग केल्याप्रकरणी पाक संरक्षण खात्याचे कान उपटण्यात आले.

LATEST VIDEOS

LiveTV