खासगी शिक्षण संस्थांना नावाशेवटी विद्यापीठ लावता येणार नाही, यूजीसीचे आदेश

13 Nov 2017 10:03 PM

बातमी खासगी शिक्षण संस्थांना मिऴालेल्या दणक्याची... यापुढं कोणत्याही खासगी शिक्षण संस्थांना युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ हा शब्द आपल्या संस्थेच्या नावाच्या शेवटी लावता येणार नाही. यूजीसीतर्फे असे निर्देश देण्यात आले आहेत..सध्या भारतात अनेक खासगी संस्थांच्या नावाच्या शेवटी विद्यापीठ हा शब्द लावण्याची प्रथा आहे..मात्र यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो...त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे...भारतातल्या अशा १२३ अभिमत विद्यापीठांना तशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV