पुणे : कोंढवा परिसरात 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

15 Dec 2017 12:36 PM

कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघड झाली आहे. २३ वर्षीय तरुणी घरात वाद झाल्यानं घारातून निघून गेली. आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी तिने एक रिक्षा घेतली. मात्र, रिक्षा चालकाने ती एकटी असल्याचा फायदा घेत तिला निर्जन जागी घेऊन गेला. तिथं त्यानं मित्रांच्या साथीनं तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन रिक्षाचालकासह अन्य एकाला अटक केलीय. तर एका फरार आरोपीचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV