पुणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने अन्याय केला, आम्रपाली गलांडेंचा आरोप

30 Dec 2017 09:03 AM

पुण्याच्या आम्रपाली गलांडेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशननं आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. हैदराबादमधल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघात आम्रपाली गलांडेची निवड करण्यात आली होती. पण ऐनवेळी आपल्याला अनफिट ठरवून दुसऱ्या  खेळाडूची निवड करण्यात आली असल्याचा आरोप आम्रपालीनं केला आहे. त्यासाठी तिनं प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांना जबाबदार धरलं आहे. राजकारणात आपला हकनाक बळी दिला जात असल्याचा तिचा दावा आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी आपण फिट असल्याचा आम्रपालीचा दावा आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV