पुणे : लाचखोरीत महसूल आणि पोलीस खातं आघाडीवर

26 Oct 2017 11:33 PM

पुणे विभागात एसीबीच्या कारवाईत महसूल आणि पोलीस विभाग आघाडीवर असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केलंय. गेल्या दहा महिन्यात एसीबीने महसूल विभागात 169 आणि पोलीस विभागात 127 प्रकरणात कारवाई केलीय. या दोन्ही विभागात श्रेणी 2 चे अधिकारी जास्त असल्याचे समोर आलंय. याबरोबरच सांगलीत 63, सातारा 24 आणि कोल्हापुरात 24 कारवाई करण्यात आल्यातं. नोटबंदीच्या निर्णयानंतर रोख स्वरुपात लाच स्वीकारण्यापेक्षा ऑनलाईन करन्सीच्या रुपात लाच घेण्याचे प्रकार घडत असल्याचं देखील एसीबीनं यावेळी स्पष्ट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV