पुणे : पुण्यातील मार्केट यार्डात कर्नाटकातला हापूस आंबा दाखल

11 Dec 2017 08:30 PM

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हापूस आंब्यांचं आगमन झालंय. दरवर्षीपेक्षा तब्बल 3 आठवडे आधी कर्नाटकातला हापूस आंबा पुण्यात आलायं. हे आंबे तयार झाल्यावर तीन हजार रुपयांना 2 डझन या दराने याची विक्री होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिलीय. मात्र कोकणातील हापूस बाजारात जानेवारीच्या मध्यापर्यंत येईल असंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान ओखी वादळाच्या तडाख्यामुळे आंब्यांचा मोहोर गळालायं. त्यामुळे कोकणच्या हापूस आंब्यांचं आगमन लांबण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

LATEST VIDEOS

LiveTV