पुणे : घराच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईची हत्या

08 Dec 2017 10:06 PM


पुण्यात पुन्हा एकदा आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीए.. जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच 70 वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय...अरुणा मनोहर सकपाऴ असे महिलेचे नाव असून मुलगा आनंद सकपाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...आईला तो सतत मारहाण करायचा...त्यादिवशी देखील त्याने आईला जबर मारहाण केली,त्यात आईचा मृत्यु झाला... दरम्यान आई उठत नसल्याने आनंद यानेच पोलिसांना कळवले...दवाखान्यात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या अंगावर कोठेही जखम नव्हती मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांच्या छातीवर जखमा आढळून आल्या...पोलिसांनी तपास केला असता आई-मुलामध्ये सतत भांडणं होत असल्याचे शेजाऱ्याकडून समजल्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला...
LATEST VIDEOS

LiveTV