पुणे: आता पुरुषांच्या मंदिरप्रवेशासाठी तृप्ती देसाईंचं आंदोलन

13 Dec 2017 10:45 AM

पुण्यातील बाणेरजवळील यमाई देवी मंदिराच्या गर्भगृहात जायला पुरुषांना बंदी आहे. आज दुपारी साडेबारा वाजता तृप्ती देसाईंच्या नेतृत्वाखाली पुरुष यमाई मंदिरात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मंदिर ट्रस्ट आणि गावातील एका गटामध्ये यावरुन वाद आहे. हे प्रकरण धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयातही गेलं होतं. त्यावर उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला होता. ट्रस्टच्या मते मंदिराच्या गाभाऱ्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही प्रवेश दिला जातो. फक्त गर्दी असेल तरच प्रवेश नाकारला जातो. पहाटेच्या आरतीवेळी स्त्री-पुरुष कुणीही मंदिरात येऊ शकतं असंही ट्रस्टने म्हटलंय.

LATEST VIDEOS

LiveTV