पिंपरी : भोसरीच्या सहल केंद्रातील खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, कारण अस्पष्ट

13 Dec 2017 09:00 PM

पिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलं.

भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.

हे पाणी एवढे गरम आहे कि प्लॅस्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV