पुणे : पालिकेत प्रस्ताव मंजुरीसाठी व्हीप काढण्याची भाजपवर नामुष्की

14 Dec 2017 07:39 PM

पुणे महापालिकेत मोठ्या गोंधळात सायकल ट्रॅक आणि उपविधी हे दोन्ही प्रस्ताव मंजुर करण्यात आलेत...यावेळी पालिका सभागृहात मोठं राजकीय नाट्य़ देखील घडलं.. पुणे पालिकेत भाजपचे 100 नगरसेवक असून देखील हे दोन्ही प्रस्ताव मंजुर करुन घेण्यासाठी भाजपवर व्हीप काढण्याची वेळ आली होती..
भाजपमधील गटबाजीचा फटका या प्रस्तावांना बसु नये म्हणून, भाजपच्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्य़ाबाबत आणि प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं, असा व्हीप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी काढला होता.. पुणे महापालिकेत सध्या पालकमंत्री गिरीश बापट गट आणि खासदार संजय काकडे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. यापूर्वीची सर्वसाधारणसभा याच गटबाजीमुळे अवघ्या पाच मिनिटात गुंडाळावी लागली होती.

LATEST VIDEOS

LiveTV