पुणे : महावितरणचा निष्काळजीपणा, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मुलगा गंभीररित्या भाजला

06 Dec 2017 10:06 PM

उघड्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागल्यामुळं पुण्यात 12 वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजलाय. महावितरणच्या निष्काळजीपणामुळं हा दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पुण्यातल्या आशिर्वाद सोसयाटीत राहणारा 12 वर्षांचा अबु शेख रविवारी इमारतीखाली क्रिकेट खेळत होता. खेळताचा उघड्या ट्रान्सफॉर्मरजवळ गेलेला चेंडू आणण्यासाठी अबू गेला असता ट्रान्सफॉर्मरजवळ छोटा स्फोट झाला आणि त्यात अबू गंभीररित्या भाजलाय. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र वारंवार तक्रार करूनही महावितरणनं 22 हजार वोल्ट क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरभोवती कुंपण का घातलं नाही असा सवाल स्थानिकांनी विचारलाय.

LATEST VIDEOS

LiveTV