पुणे : अंध बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन

08 Dec 2017 11:27 PM

पुण्यात रोटरी क्लब आणि मृणाल स्पोर्टस फाऊंडेशन द्वारे अंध बांधवांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय. राज्यातील विविध भागातून आठ टिम या स्पर्धेत सहभागी होणार असून प्रत्येक टिम मध्ये 11 खेळाडू असतील...त्यामध्ये पाच खेळाडू पुर्णपणे अंध तर सहा खेळाडू 60 ते 70 टक्के अंध असतील. यांच्या बॉलमध्ये लोखंडी छर्रे असतात जेणे करुन ते आवाजावरुन बॉल ओळखू शकतील. स्टंप देखील लोखंडी असून त्याला घुंगरू बांधलेले असतात.
जिंकणाऱ्या संघाला 15 हजार रुपये आणि ट्रॉफी तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला 10 हजार आणि ट्रॉफी मिळेल

LATEST VIDEOS

LiveTV