पुणे : पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांचं स्टिंग, आजचा सामना रद्द होण्याची शक्यता

25 Oct 2017 11:42 AM

जंटलमन्स गेम समजला जाणाऱ्या क्रिकेटवर आणखी एक काळा डाग लागला आहे.

पुण्यातील गहुंजे मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने समोर आणलं आहे.

या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे.

बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच दोषीवर कारवाई करु असंही म्हटलंय.

दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV