पुणे : डीएसकेंना दिलासा, 50 कोटी जमा करण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत मुदत

22 Dec 2017 09:18 PM

बांधकाम व्यावसियाक डी. एस. कुलकर्णींच्या अटकपूर्व जामीनाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 19 डिसेंबरला मुंबई हायकोर्टात सरकारी वकिलांनी डी.एस. कुलकर्णींच्या अटकपूर्व जामिनावर युक्तीवादच केला नसल्याची माहिती आहे.

त्यामुळेच डीएसकेंना अटकपूर्व जामिनाबाबत हायकोर्टाने अजून निर्णयच घेतला नसल्याचं समोर आलंय. याचाच फायदा घेत डीएसकेंनी सुप्रीम कोर्टातून जामीन आणि 50 कोटी भरण्याची मुदतही वाढवून मिळवली. आता 18 जानेवारीपर्यंत 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदत सुप्रीम कोर्टाने डीएसकेंना दिली आहे.

50 कोटी रुपये 15 दिवसात हायकोर्टात जमा करण्याची देण्यात आलेली मुदत 19 डिसेंबर रोजी संपली होती. मात्र सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी डीएसकेंचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासंदर्भात युक्तीवादच केला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV