मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना अटकेची शक्यता!

19 Dec 2017 09:17 PM

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. डी.एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदतवाढ मुंबई हायकोर्टाने दिली होती. ही मुदत आज संपली असून डी.एस. कुलकर्णी यांनी आणखी काही दिवस मुदत वाढ मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV