पुणे : डीएसकेंविरोधात त्यांच्या भावाचे जावई केदार वांजपे कोर्टात

25 Dec 2017 08:09 PM

बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यांचे जावई केदार वांजपेंनी त्यांच्यावर १०० कोटींचा दावा ठोकलाय. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या भावाचे जावई असलेल्या केदार वांजपेंवर गंभीर आरोप केले होते. केदार व्यवसायातल्या महत्वाच्या गोष्टी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना पुरवत असल्य़ाचा आरोप केला होता. यामुळे केदार यांनी डीएसकेंवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. केदार आधी डिएसकें सोबत काम करत होते. ड्रीमसिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आर्थिक कारणांवरून वाद झाल्याने केदार वांजपे 2009 साली डिएसकेंपासून वेगळे झाल्याचं कळतं. डीएसकेंनी जाहीर माफी मागावी अशी मागमी त्यांनी केली.

LATEST VIDEOS

LiveTV