पुणे : मद्यधुंद अवस्थेतील तरुण तरुणीला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

14 Dec 2017 07:45 PM

तीन तरुणांनी एका तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हारयल झालाय. पुण्यामध्ये ही घटना घडली असून मारहाण करणारे तरुण हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. सोबतच मारहाण करणारे तरुण कोण आहेत आणि तरुणी कोण आहे याचा पत्ता लागलेला नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. नगररोडच्या उप्पाला हॉटेलच्या शेजारी बुधवारी ही घटना घडली असून इथल्याच एका नागरिकानं मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. त्याप्रमाणे व्हिडीओतील तरुणांचा शोध सुरु असून प्रकरणाचा छडा लावू, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV