पुणे : डीएसकेंना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, मंगळवारी पुन्हा सुनावणी

04 Nov 2017 08:48 PM

आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुणे सत्र न्यायालयानं डीएसकेंना मंगळवारपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सरकारी वकिलांच्या ढिसाळपणामुळे डीएसकेंना जामीन मिळाल्याची चर्चा आहे. डीएसकेंचे वकील श्रीकांत शिवदेंनी बाजू मांडली आणि काही कागदपत्रं सादर केली. मात्र सरकारी वकील सुनील हांडेंनी या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी वेळ मागून घेतला. शिवदे सोमवारी पुण्यात नसल्यानं कोर्टानं हांडेंना बाजू मांडण्यासाठी मंगळवारचा वेळ दिलाय. पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानं डीएसके अडचणीत सापडले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV