पुणे: गँगस्टरला मद्यपानाची मुभा देणं पोलिसाला महागात

08 Nov 2017 11:51 AM

पुण्यात गँगस्टरला मद्यपान करण्यास मुभा देणाऱ्या एका फौजदारासह 6 जणांना निलंबित करण्यात आलंय. रुपेश मारणे असं गँगस्टरचं नाव असून त्याला येरवडा कारागृहातून पनवेल इथल्या न्यायालयात नेण्यात येतं होतं. आरोपीनी येताना आणि जाताना दोन्ही वेळेस मद्यपान केल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं आहे. याची तत्काळ दखल घेतं अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील फौजदार आणि हवालदारांवर कारवाई केली. रुपेश मारणे हा कुख्तात गुंड गजा मारणेचा उजवा हात समजला जातो.  

LATEST VIDEOS

LiveTV